Join Whatsapp Group

Join Telegram Group

कुसुम सोलर पंप वितरण योजना 2023 | Best कुसुम सोलर पंप वितरण योजना काय ? | Kusum Solar Pump Yojana 2023 Online Registration Application

कुसुम पंप  योजना  : महाराष्ट्र सरकारने कुसुम सोलर सबसिडी योजना 2023 राबवली आहे. महाराष्ट्र सरकारने कुसुम सोलर पंप योजना(Kusum solar pump Yojana) चालू केली आहे. या योजनेत वीज वर चालणारे पंप मोटर हे आता सौर ऊर्जेवर चालवता येणार आहे. व या योजनेमुळे अन्य गोष्टींचा म्हणजेच वीज जनरेटर त्यासाठी लागणारे डिझेल इत्यादी यांचा खर्च शेतकऱ्यास होणार नाही.

कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी चालू केले आहे. ही योजना महा कृषी ऊर्जा अभियान प्रधानमंत्री कुसुम पंप योजना जाहीर करण्यात आली असून यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागतात.

कुसुम सोलर पंप वितरण योजना 2023

महाकृषी ऊर्जा अभियान अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम योजना 2023 सर्व राज्यात जाहीर झाली आहे. पूर्वी पंप मोटर चालू करण्यासाठी वीज डिझेल इंजिन पेट्रोल इंजिन लागत होते व शेतकऱ्यांना शेतीस पाणी पिण्यासाठी विहिरीतून पाणी उपसण्यासाठी पूर्वी फार अडचणी येत होत्या त्याचाच विचार करता पीएम कुसुम योजना 2023 केंद्र सरकारने कुसुम पंप योजना वेगवेगळ्या राज्यात चालू केली आहे . कुसुम सोलर पंप योजना अंतर्गत पंप मोटर आता सौर ऊर्जेवर शेतकऱ्यास चालवता येणार आहे. याचा फायदा म्हणजेच विजेचा कमी वापर व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते.

अटल सौर कृषिपंप योजना-१ व २ आणि मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेसाठी पात्र नाहीत. त्यामुळे त्यांनी महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरु नयेत. तरी सुद्धा अर्ज भरल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल. महाकृषि ऊर्जा अभियन पीएम-कुसुम घटक-ब योजनेअंतर्गत एका लाभार्थी शेतकऱ्याने एकाच सौर कृषिपंपाकरीता अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास इतर अर्ज रद्द करण्यात येईल.

Kusum solar pump Yojana
Kusum solar pump Yojana

ही योजना फक्त जेथे जेथे वीज पुरवठा पोहोचला नाही व ज्या शेतकऱ्यांस वीज पुरवठा अद्याप उपलब्ध झाला नाही त्यांच्यासाठीच आहे.या योजनेअंतर्गत सरकारने 95 टक्के अनुदान हे अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी व 90% खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी अनुदानावर कुसुम सोलर पंप उपलब्ध होतील.

Kusum Solar Pump Yojana 2023 Information

  •  योजनेचे नाव

कुसुम सोलर पंप योजना 2023

  •  कोणा मार्फत सुरू केली

 महाराष्ट्र शासन व केंद्र शासन

  •  लाभार्थी

भारतातले सर्व राज्य

  •  उद्दिष्ट

       शेतकऱ्यांना सौर ऊर्जा सोलार पंप पुरवणे

  •  अर्ज प्रक्रिया

ऑनलाइन

  •  ऑफिशियल वेबसाईट

→  क्लिक करा

कुसुम सोलर पंप योजना लाभार्थी निवड 2023

PM कुसुम सोलार वितरण योजना 2023 लाभार्थी

  1. अद्याप जिथे वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे शेतकरी.
  2. अटल सौर ऊर्जा कृषी पंप योजना या टप्प्यातील न मंजूर झालेले अर्जदार गट एक व दोन यांना प्रथम प्राधान्य.
  3. विहीर बोरवेल शेततळे जवळची नदी उपलब्ध असणारे लाभार्थी.

PM कुसुम सोलार वितरण योजना Documents 

  • आधार कार्ड
  • जमिनीचा 7/12
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज
  • फोटो बँक
  • पासबुक
  • शेत जमीन, विहीर ना हरकत पत्र
  • रद्द झालेला चेक

शेळी मेंढी पालन योजना 2023

PM कुसुम सोलर पंप वितरण योजनेची वैशिष्टये

  • कुसुम सोलर पंप योजना च्या अंतर्गत महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन यांचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा सोलार पंप शेतीस कामे यावा.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी वीज ही सौरऊर्जेद्वारे वीज पुरवठा व्हावा.
  • लाभार्थ्याच्या शेतजमिनीनुसार व क्षमतेनुसार तीन एचपी पाच एचपी 7.5 एचपी सौर ऊर्जा पंप उपलब्ध होणार.
  • शेतकऱ्यांना विजेची कोणतीही काळजी लागू नये व शेती व्यवसाय उत्सवाने चालावा.

 

कुसुम सोलार पंप योजना अनुदान

कुसुम सोलर पंप योजना अनुदान पुढील प्रमाणे

PM कुसुम सोलर पंप योजना या योजनेअंतर्गत सरकारने लाभार्थ्यांसाठी सबसिडी दिलेली आहे याची माहिती याप्रमाणे,

महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार यांच्या अंतर्गत मिळणारी सबसिडी ही राज्यांवरती अवलंबून आहे. या योजनेत कुसुम सोलर पंप यावर 50% ते 90% पर्यंत सरकारद्वारे अनुदान मिळू शकते.

पीएम कुसुम सोलर पंप योजना या योजनेअंतर्गत सरकारने लाभार्थ्यांसाठी सबसिडी दिलेली आहे याची माहिती याप्रमाणे.\

शेतकऱ्याला 3Hp कुसुम पंप खुला वर्ग : 19380/- अनुसूचित जमाती यासाठी 9690/- अन्य कोणतीही रक्कम भरावी लागणार नाही.

तसेच पाच 5Hp कुसुम पंप खुला वर्ग 2695/-  व अनुसूचित जमाती जमाती 13488/- अन्य कोणती रक्कम भरावी लागणार नाही.

तसेच 7.5Hp कुसुम पंप खुला वर्ग 37440/- तर अनुसूचित जाती जमाती 18720/- अन्य कोणताही रक्कम भरावे लागणार नाही.

कुसुम सोलर पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज कोठे व कसा भरावा ?

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून कुसुम सोलार पंप ऑनलाईन रजिस्ट्रेशन अर्ज करू शकता.

Join YouTube Channel : कृषि संवाद

                                                      क्लिक करा :   kusum.mahaurja.com

  1. वरील लिंक वरती क्लिक केल्यानंतर खाली दिलेला डॅशबोर्ड तुला होईल. वरती तुमचे सर्व अचूक माहिती भरावी.
  2. पुढे आल्यानंतर एप्लीकेशन फॉर न्यू ऑफ ग्रीड सोलर पंप रिप्लेसमेंट ऑफिस असेल तर होय करा नसेल तर नाही राहू द्या.
  3. त्यापुढे पर्सनल अँड डिटेल्स ऑफ एप्लीकेट म्हणजे तुमची सविस्तर माहिती त्या ठिकाणी भरायचे आहे पहिल्या कॉलम मध्ये आधार कार्ड क्रमांक व्यवस्थित आणि अचूक टाकायचा आहे त्यापुढे स्टेट ऑटोमॅटिक सिलेक्ट राहील असेल तर महाराष्ट्र असेल तर राहू द्या.
  4. नसेल तर जो काही तुमचा जिल्हा असेल तो त्या ठिकाणी निवडायचा आहे पुढे त्या ठिकाणी तुमचा जिल्हा निवडायचा आहे लँड तालुका त्याठिकाणी तुमचा तालुका निवडायचा आहे लँडविलेज त्या ठिकाणी तुमचं गाव निवडच आहे त्यापुढे मोबाईल नंबर जो काही तुमचा आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर आहे.
  5. तो त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याच्यापुढे जात म्हणजे कास्ट कॅटेगिरी जी काही तुमची कास्ट कॅटेगरी असेल ती त्या ठिकाणी टाकत असेल ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी त्याठिकाणी टाका नसेल तर सोडून द्या फील केल्यानंतर क्लिक करायचे आहे.

Kusum solar pump Yojana

निष्कर्ष

मित्रांनो या लेखात मी कुसुम सोलर पंप 2023 यासंदर्भातील सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला असून त्याच्या मागचा सरकारचा मेन उद्देश शेतकऱ्यांपर्यंत सौर ऊर्जा कुसुम पंप उपलब्ध करून देण्याचा आहे त्यासाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्र व ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची लिंक वरती दिली आहे.

FAQ

Q1.  कुसुम सोलर पंप योजना काय आहे ?
Ans.  कुसुम सोलर पंप योजना ही केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार द्वारे शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेवरती चालणारे कुसुम पंप म्हणजेच वीज पुरवठा व त्यावर चालणारे मोटर प्राप्त व्हावे. अशी कुसुम सोलर पंप योजना आहे.

Q2 .  कुसुम सोलर पंप योजने वरती लाभार्थ्याला अनुदान किती मिळेल ?
Ans. कुसुम सोलर पंप योजनेला महाराष्ट्रात केंद्र शासन व महाराष्ट्र शासन याद्वारे 90% ते 95% टक्के अनुदान प्राप्त होऊ शकते म्हणजेच शेतकऱ्याला किंवा लाभार्थ्याला 5% ते 10% टक्के रक्कम भरावे लागणार आहे.

Q3. कुसुम योजना फायदेशीर आहे का आणि कुसुम सौर पंप वितरण योजना काय आहे? 
Ans :

कुसुम सोलार पंप योजना  एक मेगा वॅट सौर ऊर्जा प्रकल्प दरवर्षी 15 लाख 84 हजार इतके युनिट्स उत्पादन करतो. आपण जर विचार केला तर एक युनिट ची किंमत साडेतीन ते चार रुपये ग्राह्य धरली तर त्याची किंमत आपण पंधरा लाख 84 हजार युनिट्स जर केलं तर 55 लाख 44 हजार इतके त्याचे पैसे होतात. कुसुम सौर पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप 60 टक्के इतके अनुदान देण्यात येईल. ही योजना केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी सुरू केली आहे. पीएम कुसुम योजना अंतर्गत सरकारने डिझेलवर चालणारे पंप आणि इलेक्ट्रॉनिक पंप यांना लागणारे डिझेल खर्च कमी करण्यासाठी सौर ऊर्जा पंप योजना चालू केली आहे.

1 thought on “कुसुम सोलर पंप वितरण योजना 2023 | Best कुसुम सोलर पंप वितरण योजना काय ? | Kusum Solar Pump Yojana 2023 Online Registration Application”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

luxury brand watches for ladies Animal Movie : is a 2023 Indian Hindi-language action thriller film