Join Whatsapp Group

Join Telegram Group

Gai Gotha Anudan | गाई गोठा अनुदान योजना | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2023 | अर्ज प्रक्रिया, लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्र. | Best Gay gotha anudan yojana

Gai Gotha Anudan  : नमस्कार मित्रांनो, गाय गोठा अनुदान याविषयी आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत गाय गोठ्यासाठी 77 हजार 188 रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे या योजनेसाठी लाभार्थी आवश्यक कागदपत्रे योजनेचे वैशिष्ट्ये उद्देश तसेच अन्य काही मुद्दे आजच्या लेखाद्वारे आपण बघणार आहोत. तर वाचकांना विनंती सर्व माहिती नीट आणि व्यवस्थित वाचा आणि नंतरच अर्ज करा. महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवीत असते. महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार चा या योजनेअंतर्गतचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचा आर्थिक विकास व सामाजिक विकास व्हावा असा आहे.

या योजनेचे नाव शरद पवार ग्राम समृद्धी योजना आहे. तसेच ही योजना केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या अनुमनाने पंचायत समिती नुसार राबवण्यात येते.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणजेच पशुपालन यामध्ये गाई, शेळी, बकरी इत्यादींचा समावेश असतो. तसेच ठराविक जागा, पक्के शेड असणे आवश्यक असते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, या ऋतूंचा विचार करता गाई गोठा असणे महत्त्वाचे असते.

मित्रांनो महाराष्ट्र हा शेतीप्रधान देश आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये केला जातो. आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या घरी एक तरी गाय बघायला. कारण घरचे दूध आणि शेतासाठी खत निर्माण होतं. शेतीसाठी खत विकत घेणे परवडत नाही त्यासाठी प्रत्येकाच्या घरी एक तरी गाई तुम्हाला बघायला मिळतेच.

आज जर आपण बघितलं तर दुधाला दर सुद्धा चांगला मिळत आहे आणि नवीन नवीन तंत्रज्ञानामुळे दूध काढणे सुद्धा सोपे झाले आहे. सध्या पाहिलं तर सर्वजण मुरघास करतात आणि गाईंसाठी चारा पुढील काळासाठी जमा करून ठेवतात. महाराष्ट्र मध्ये एकदम नियोजनबद्ध दूध व्यवसाय सध्याच्या कडेला पाहायला मिळत आहे आणि त्यात सुद्धा आणखीन सोपं काय करता येईल याकडे मानव मोठ्या प्रमाणे लक्ष देत आहे.

Gai Gotha Anudan Yojana 2023

आज आपण बघत आहोत की राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याकडे गाई शेळी मेंढी बकरी असते. आत्ताच्या काळात दुग्धजन्य पदार्थ व दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच शेतकऱ्यांची गाय गोठा याबद्दलची भूमिका बदलत चालले आहे. गाई सांभाळण्यासाठी गोठा असणे खूप महत्त्वाचे आहे. राहण्यासाठी पक्या स्वरूपाचे ठिकाण असणे गरजेचे आहे व नसल्यास ऊन वारा पाऊस यांच्यापासून जनावरांचे संरक्षण करणे अवघड जाते.

गाय गोठा अनुदान योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी गाय गोठा अनुदान देण्यात येत असते. या योजनेत गोठा बांधकाम गायांची खरेदी व दूध व्यवसायासाठी लागणारे सर्व उपकरणे व अवजार खरेदीसाठी अनुदान दिले जाते.

Gai gotha anudan
Gai gotha anudan

योजनेची माहिती

  •  योजनेचे नाव

शरद पवार ग्राम समृद्धी योजना

  •  विभाग

कृषी पशुसंवर्धन विभाग

  •  लाभार्थी

शेतकरी व महाराष्ट्र तील ग्रामीण भागातील शेतकरी

  •  योजनेचा लाभ

77188 रुपये

  •  अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन

  •  ऑफिशियल वेबसाईट

क्लिक करा

गाय बांधण्याची जागा ओबडधोबड व त्या जागेवर छोटे-मोठे दगडी असतात त्यामुळे गायांची आजारी पडण्याची संख्या वाढत जाते. व गाईंची सुदृढता पहिल्यासारखी राहत नाही. याचा विचार करता गायबांनी साठी व पशुपालनासाठी पक्क्या स्वरूपाचे ठिकाण असणे आवश्यक असते.

गाय गोठा अनुदान योजना : गोठा कसा असावा ? : Gai Gotha Anudan

गाय व म्हैस यांच्यासाठी गोट्याचे बांधकाम

  1. गोठ्याचे काम करण्यासाठी स्वतःची जागा पाहिजे.
  2. त्या जागेमध्ये दोन ते सहा गाय गोठा बांधणीसाठी 77118 रुपये अनुदान दिले जाते.
  3. 6 पेक्षा अधिक व 12 गुरांपेक्षा कमी यासाठी दुप्पट अनुदान दिले जाते.
  4. गुरांसाठी या योजनेअंतर्गत 18 गुरांसाठी तीन पट जास्त अनुदान दिले जाते.
  5. गोठ्यातील जनावरांना पिण्याच्या पाण्याचा साठा यासाठी 200 लिटर क्षमतेची टाकी.

 

Gai Gotha Anudan योजना आवश्यक कागदपत्र.

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मोबाईल नंबर
  • मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • ग्रामपंचायत शिफारस पत्र
  • जॉब कार्ड
  • आदिवासी प्रमाणपत्र
  • जन्माचा दाखला
  • महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक
  • कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
  • लाभार्थ्याचा पासपोर्ट साईज फोटो
  • जमिनीचा 7/12
  • गाय गोठा Project Report
  • ग्रामपंचायत शिफारस पत्र

नक्की पहा : शेळीपालन अनुदान योजना

Gai Gotha Anudan योजनेचा मुख्य उद्देश

  1.  जनावरांसाठी राहण्याचे पक्के ठिकाण निर्माण व्हावे.
  2. शेतकरी स्वयंपूर्ण व विकासशील गाय म्हैस दूध उत्पादक करणे.
  3.  जनावरांचे ऊन वारा पाऊस यांपासून संरक्षण व आजारापासून सुटका.
  4.  दूध उत्पादनात मोठ्या संख्येने वाढ व्हावी.
  5.  शेतकरी वर्ग हा प्रगतशील व आत्मनिर्भय करणे.
  6.  शेतकरी वर्गास गोठा बांधणी साठी आर्थिक सहायता करणे.
  7.  गाय गोठा योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकरी वर्गास कर्ज काढणे अवघड जाते तसेच आर्थिक परिस्थितीमुळे कर्ज काढणे ही सोपे जात नाही त्यासाठी आर्थिक सहायता योजनेमार्फत व्हावी असा उद्देश आहे.

गाय गोठा अनुदान मंजूर झाल्यास गाय गोटा केलेल्या कामाचे फोटो

  • काम सुरू करण्याआधी चा फोटो मोकळ्या जागेचा फोटो.
  • गाय गोठ्याचे काम सुरू असताना चे फोटो.
  • गाय गोठ्याचे संपूर्ण काम पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यासह फोटो इत्यादी.

गाय गोठा अनुदान अर्ज कसा करावा ?

येथे क्लिक करा

तसेच महाराष्ट्र शासनाने शेळीपालन अनुदान योजना व कुक्कुटपालन अनुदान योजना राबवली आहे.
या योजनेअंतर्गत दहा शाळांसाठी गोठा बांधणी साठी 49 हजार 284 रुपये अनुदान देण्यात येते .

गाईंच्या प्रजाती.

महाराष्ट्र मध्ये गाईंच्या वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला आढळून येतात. त्यामध्ये जर्सी देशी एचएफ गाईंचे समावेश आहे आणि गावरान गाई चा देखील यामध्ये समावेश होतो तसेच मुरा जाफराबादी इत्यादी प्रकारच्या म्हशी देखील आहेत या सर्वांचा समावेश गाई आणि म्हशींचा प्रजातीमध्ये वळतात.

गाईंच्या प्रजातीमध्ये लाल कंधारी गवळाऊ सहीवाल गीर देऊनी अन्य देशी गाई एचएफ गाई इत्यादीं प्रकारच्या गाई आपल्याला बघायला मिळत आहेत.

आपण जर पाहिलं तर शेतीला पूरक म्हणून पशुपालन हा व्यवसाय शेतकरी. दूध उत्पादनासाठी गाईला सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात पहिले स्थान दिले जात आहे. त्यामध्ये सुद्धा एचएफ गाईंचा मोठ्या प्रमाणात समावेश होत आहे. सरासरी 20 ते 40 लिटर दूध दिवसाला देण्याची क्षमता एचएफ. तसेच सध्या जर आपण एचएफ गाईंची किंमत बघितली तर एक लाख रुपयांपासून ते तीन लाखांपर्यंत एच एफ गायीची किंमत आजच्या काळा नुसार गायीची ठेवण उंचवटा दुधाच्या शिरा गायची कातन इत्यादी घटकांनुसार त्या एचएफ गायची किंमत ठरवली जाते.

गाय गोठा अनुदान योजना फायदा
  1. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला गाय व म्हैस यांच्यासाठी राहण्याची पक्क्या स्वरूपाचे गोठा बांधून देण्यासाठी अनुदान दिले जाते.
  2. योजना अंतर्गत शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
  3. दूध उत्पादनात मोठ्या संख्येने वाढ होऊन शेतकऱ्याचे जीवनमान सुधारेल.
  4. शेतकऱ्याला कर्ज काढण्याची गरज लागणार नाही.
  5. दूध व्यवसाय बरोबरच शेतकरी दुधापासून अन्य पदार्थ देखील बनवून रोजगार निर्मिती करत आहे. दुधापासून खवा शुद्ध तूप यांची निर्मिती करून मोठ्या संख्येने शेतकरी पैसे कमवत आहे. आता आपण जर बघितलं तर गाय पासून दूध दुधापासून शुद्ध दूध दुधापासून खावा पेढा पनीर तूप ताक इत्यादी अन्य प्रकारचे पदार्थ बनवून विक्री करत आहेत. तसेच सर्वांचे आवडते आईस्क्रीम देखील दुधापासून बनवली जाते.
  6. गाईच्या दुधापासून बनवलेल्या शुद्ध तुपाची किंमत आजच्या काळात 600 ते 800 रुपये इतकी आहे तसेच आईस्क्रीमचे दर 5 रुपयापासून ते 1000 रुपये इतके आहे

FAQ

Q1. गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्यास किती अनुदान मिळेल ?

गाय गोठा अनुदान योजना अंतर्गत लाभार्थ्यास सहा गाय गोठा बांधणीसाठी 77 हजार 118 रुपये तसेच 12 गुरांसाठी दोन पट जास्त अनुदान व 18 गुणांसाठी तीन पट जास्त अनुदान दिले जाते.

Q2. गाय गोठा अनुदान योजनाचे नाव काय आहे ? 

गाय गोठा अनुदान योजनेचे नाव शरद पवार ग्रामसमृद्धी योजना असे आहे.

Q3. गाय गोठा अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ?

योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन.

1 thought on “Gai Gotha Anudan | गाई गोठा अनुदान योजना | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2023 | अर्ज प्रक्रिया, लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदपत्र. | Best Gay gotha anudan yojana”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

luxury brand watches for ladies Animal Movie : is a 2023 Indian Hindi-language action thriller film